गोड बोलून स्वतःच्या मुलाला गोव्याला आणलं आणि ,  सीईओ महिला ताब्यात

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक प्रकरण सध्या समोर आलेले असून बंगळुरू शहरातील एका कंपनीच्या सीईओ महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलाच्या हत्येचा कट रचलेला होता . कटाचा भाग म्हणून ती मुलाला घेऊन फिरायला गोव्याला घेऊन आली आणि हॉटेलच्या खोलीत तिने त्याचा खून केला असा संशय गोवा पोलिसांनी व्यक्त केलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , महिला राहत असलेल्या खोलीतून कप सिरपच्या दोन रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या असून हत्या करण्यापूर्वी या महिलेने मुलाला कप सिरपचा हेवी डोस दिला असावा आणि त्यानंतर मुलाची हत्या केली असावी असा अंदाज आहे. मुलाचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलेला असून त्यामध्ये मुलाची हत्या गळा दाबून करण्यात आलेली आहे मात्र हाताचा वापर केला नाही त्यामुळे उशी किंवा टॉवेलने हा खून केल्याचा अंदाज आहे. 

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार मुलाचा चेहरा आणि छाती सुजलेली होती आणि त्याच्या नाकातून रक्त देखील वाहत होते . पोस्टमार्टमच्या 36 तास आधी मुलाचा मृत्यू झालेला असून त्याच्यावर बंगळुरू मुलाचे वडील वेंकटरमण यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेले आहेत . ज्या महिलेने खून केला तिच्या चेहऱ्यावर कुठलीही दुःख आढळून येत नाही. 

सूचना सेठ असे या महिलेचे नाव असून ती माइंड फुल ए आय लॅब ची सीईओ आहे. डाटा सायंटिस्ट म्हणून ती काम करत असून या इथिक्स लिस्टमध्ये 100 प्रभावी महिलांमध्ये तिचा समावेश होतो. सूचना हिने तिचे पती वेंकटरमण यांच्याकडून दरमहा अडीच लाख रुपयांची पोटगी मिळावी अशी मागणी केलेली होती . आपल्या पतीला कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न आहे आणि त्याने माझा व मुलाचा त्याने छळ केलेला आहे असा तिचा आरोप होता.

आपल्या पतीच्या विरोधात तिने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा देखील नोंदवला आणि काही whatsapp मेसेज पोलिसांना तसेच न्यायालयातही सादर केलेले होते . मुलाची हत्या केली त्यावेळी व्यंकट रमण हे इंडोनेशियामध्ये होते. आपल्या मुलाला ते कायम भेटायचे हे सूचना हिला आवडत नव्हते त्यातून तिने हा प्रकार केल्याचा अंदाज आहे. 


शेअर करा