घंटा का वाजवली ?, तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

शेअर करा

किरकोळ कारणावरून गुन्हेगारीचे प्रमाण महाराष्ट्रात वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार नगर शहराजवळील पिंपळगाव माळवी इथे समोर आलेला आहे. मंदिरातील घंटा सतत का वाजवतोस ? असे म्हणत एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे . पिंपळगाव माळवी येथील सटूबाईच्या मंदिरात दोन तारखेला ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अण्णासाहेब बारगळ, मनोज अण्णासाहेब बारगळ, मच्छिंद्र बाबासाहेब बारगळ ( सर्वजण राहणार पिंपळगाव माळवी तालुका नगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे असून त्यांच्या विरोधात अक्षय घोडके नावाच्या तरुणाने फिर्याद दिलेली आहे. 

अक्षय घोडके सटूबाईच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी दुपारी मंदिरात आल्यानंतर घंटा वाजवली त्याचा आरोपींना राग आला आणि फिर्यादी यास शिवीगाळ करण्यात आली. फिर्यादीने मला शिवीगाळ करू नका असे सांगितल्याचा राग आल्यानंतर आरोपींनी आपल्याला मारहाण केली असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे.


शेअर करा