‘ गनिमी कावा ‘ ईव्हीएम हटवणार का ?,  मराठा बांधवांच्या नियोजनाची चर्चा

शेअर करा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरू असून रोज ठीक ठिकाणी भेट देऊन मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांमध्ये आरक्षणाविषयी जनजागृती करत आहे. मराठ्यांच्या गनिमी काव्याचा भाग म्हणून प्रत्येक गावातून दोन उमेदवार लोकसभेसाठी उभे करण्याचे नियोजन असून प्रत्यक्षात जर हे झाले तर मोठ्या प्रमाणात उमेदवारांची संख्या वाढेल आणि सद्य परिस्थितीत असलेली ईव्हीएम यासाठी निकामी ठरतील त्यावेळी मतपत्रिकेवरच निवडणूक घेण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. 

सोलापूरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळे यांनी याप्रकरणी सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यालयाकडे दहा हजार वोटिंग मशीन असून जास्तीत जास्त 64 उमेदवार उभे राहिले तर निवडणुकीचे नियोजन करता येईल मात्र यापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले तर नियोजन कसे करावे याविषयी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितलेले आहे. 

दुसरीकडे अनेक ठिकाणी ग्रामीण पातळीवर मराठा बांधवांकडून गनिमी काव्याचे नियोजन सुरू असून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 300 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहण्याची घोषणा करण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अडचणी वाढणार असून मतपत्रिकेवर निवडणूक घेतली तर नि:पक्षपाती निवडणूक होण्याची देखील जास्त चिन्हे आहेत. सध्या भाजप वगळता सर्वच पक्षांच्या मनात शंका असून मतपत्रिकेवरील निवडणूक ही जास्त पारदर्शक आहे अशी भूमिका अनेक पक्षांकडून घेण्यात आलेली आहे. 


शेअर करा