‘ थोडे दिवस थांबा आणि भविष्यात.. ‘ आमदार निलेश लंके म्हणाले की.. 

शेअर करा

नगर जिल्ह्यात सध्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची जोरदार चर्चा राज्यभरात सुरू असून महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांच्यात ही लढत होण्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुजय विखे आणि लंके यांनी एकमेकांवर सातत्याने आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. 

शेवगाव येथे बोलताना आमदार लंके यांनी , ‘ मी जिल्ह्यात अनेक ठिकाणी फिरत असून बेरोजगार युवक , कष्टकरी शेतकरी मला स्वतःहून भेटतात आणि त्यांचे प्रश्न मांडतात . नगर दक्षिण मतदार संघातील मागील विकास हा मागील पाच वर्षांपासून ठप्प झालेला आहे. मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखवून पदे मिळवणाऱ्यातला मी नाही ‘ असे म्हटले आहे. 

निलेश लंके पुढे म्हणाले की , ‘  लोकांची दिशाभूल करण्यात आपल्याला दिशाभूल करण्यात आपल्याला स्वारस्य नसून लोकांची कामे करण्यात मी माझा आनंद मानतो . निवडणूक असो वा नसो मला गोरगरिबात राहायला आवडते. थोडे दिवस थांबा आणि भविष्यात काय होते ते पहा ‘, असे म्हटलेले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस एडवोकेट प्रताप ढाकणे यांच्यासोबत इतरही अनेक राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 


शेअर करा