नगर शहरात निवृत्त सैनिकाला एक फोन आला अन , रक्कम ऐकाल तर.. 

शेअर करा

नगर शहरात सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळत असून सायबर पोलिसात एका निवृत्त सैनिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . शेअर ट्रेडिंग मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा तुम्हाला मिळून देतो असे सांगून निवृत्त झालेल्या लष्करी जवानाला तब्बल 31 लाख 70 हजार रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , नीरजकुमार नागेश्वर ठाकूर ( वय 39 राहणार विजय लाईन भिंगार ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून 22 डिसेंबर 2023 रोजी त्यांना इंस्टाग्रामवर शेअर मार्केटमध्ये पैसे अडकवून मोठ्या प्रमाणात नफा मिळवणेविषयी जाहिरात वाचण्यात आलेली होती. त्यांनी लिंक ओपन केल्यानंतर ते एका व्हाट्सअप ग्रुपला जॉईन झाले तेव्हा ग्रुपमधील एक महिला आणि पुरुष यांनी त्यांच्यासोबत सातत्याने संपर्क करत मोठ्या नफ्याचे त्यांना आमिष दाखवले. 

फिर्यादी यांचा आरोपींवर विश्वास बसला आणि त्यानंतर 4 मार्चपर्यंत आरोपींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सुमारे 31 लाख 70 हजार रुपये त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने पाठवले मात्र एक रुपया देखील त्यांना परत देण्यात आला नाही. त्यांनी चौकशी केली त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली म्हणून अखेर त्यांनी सायबर पोलिसात 21 तारखेला आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा