पोलीस दारात आलेले पाहताच व्यक्तीने गमावले प्राण ,  घरातील झडतीत मात्र.. 

शेअर करा

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला असून अमली पदार्थ विक्रेत्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला मात्र पोलीस दारात पाहताच संबंधित व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि तो जागेवर कोसळला त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. 

पुण्यातील नाना पेठ परिसरातील ही घटना असून संबंधित व्यक्तीच्या घरी पोलीस पोहोचले त्यावेळी पोलीस दारात आल्याचे पाहताच हा व्यक्ती घाबरून गेला आणि हृदयविकाराच्या झटक्याने जागीच कोसळला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. 

मयत व्यक्तीचे नाव 52 वर्ष असून जखमी अवस्थेत त्यास रास्ता पेठ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते मात्र तोपर्यंत त्याने प्राण गमावले होते. पोलिसांनी त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली त्यावेळी काही आमली पदार्थ घरातून जप्त करण्यात आलेले असून समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे


शेअर करा