अल्पवयीन मुलीच्या फोटोचा वापर करत इंस्टाग्रामवर बदनामी , सायबर पोलिसात गुन्हा दाखल 

शेअर करा

नगरमध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून एका सोळा वर्षीय मुलीचे नाव आणि फोटो वापरून इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट ओपन करत तिची बदनामी करण्यात आलेली आहे. नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

फिर्यादी मुलगी ही मूळची राहुरी तालुक्यातील असून शिक्षण घेत आहे. इंस्टाग्रामवर एका अज्ञात व्यक्तीने तिचे बनावट अकाउंट बनवले आणि त्यानंतर तिचा फोटो वापरून त्यासंदर्भात आक्षेपार्ह असा मजकूर तिच्या कुटुंबीयांच्या बाबत पोस्ट केला. 

सदर बाब लक्षात आल्यानंतर तिने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर कुटुंबीयांनी सायबर पोलिसात दाखल होत आरोपीच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे . भारतीय दंड विधान कलम 500 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 सीप्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


शेअर करा