महिला विनयभंग प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन , सरकारी कार्यालयातील प्रकरण 

शेअर करा

एका महिलेचा विनयभंग प्रकरणात अमरावती येथील विक्रीकर उपायुक्त मारोतराव राठोड यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अखेर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिलेला असून राठोड याच्यावर विक्रीकर महिला निरीक्षकाचा विनयभंग तसेच ॲट्रॉसिटीचा आरोप आहे. 

फिर्यादी महिला विक्रीकर निरीक्षक यांची 2023 मध्ये अमरावती येथून बुलढाणा जिल्ह्यात बदली झालेली होती. त्यांना ती बदली नको असल्याकारणाने त्यांनी राठोड तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना बदली रद्द करण्याची विनंती केली मात्र त्यानंतर राठोड यांनी तक्रारदार महिलेला मोबाईलवर मेसेज पाठवले त्यामध्ये ‘ नको ती’ मागणी करण्यात आली असे महिलेचे म्हणणे आहे . 

अमरावती येथील गाडगे नगर पोलिसांनी मारोतराव राठोड याच्या विरोधात विनयभंग तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. जिल्हा व सत्र न्यायालयाने राठोड यांस जामीन नाकारला म्हणून त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती त्यावरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे.


शेअर करा