नगर शहरात दर्ग्याची दानपेटी चोरण्याचा प्रयत्न , एकाला नागरिकांनी धरलं अन.. 

शेअर करा

नगर शहरातील सब जेल चौकाजवळ असलेल्या एका दर्ग्यामध्ये काही चोरट्यांनी दानपेटी चोरून नेण्याचा प्रयत्न केलेला असून पंचवीस तारखेला पहाटे हा प्रकार समोर आलेला आहे.

तीन चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात नागरिकांना यश आले आणि त्यांनी त्या चोरट्याला पोलिसांच्या हवाली केलेली आहे. ट्रस्टी आयुब बाबुभाई शेख ( वय 57 राहणार सबजेल चौक )  यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपीच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. 

सोमवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडलेला असून तीन जण चोरीच्या उद्देशाने दर्ग्यामध्ये दाखल झालेले होते मात्र दानपेटी चोरून नेण्याचा प्रयत्न करत असतानाच शेजारच्या नागरिकाला हे लक्षात आले आणि एका चोरट्याला पकडण्यात यश आले.   तिन्ही आरोपींनी मिळून या याआधी देखील अशाच पद्धतीने चोऱ्या केल्या आहेत का ? याचा देखील सध्या तपास सुरू आहे.


शेअर करा