प्रेमप्रकरणातून पानटपरीखाली जिलेटिन लावून केला स्फोट , बीडमधील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून विवाहित महिलेचे प्रकरण पानटपरीवाल्यासोबत जुळले मात्र याच महिलेच्या पहिल्या प्रियकराने दुसऱ्या प्रियकराच्या टपरीखाली जिलेटिन कांड्या लावून स्फोट करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अवघ्या दहा तासात पोलिसांनी तपास पूर्ण करून पहिला प्रियकर याच्यासोबत त्याला जिलेटिन कांड्या वायर आणि बॅटरी देणाऱ्या व्यक्तींवर देखील गुन्हा दाखल केलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अशोक भालेराव राहणार(  मूळ राहणार लातूर सध्या राहणार जवळगाव तालुका अंबाजोगाई ) असे घटनेतून बचावलेल्या दुसऱ्या प्रियकराचे नाव असून त्याचे एका महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते मात्र याच महिलेचा पहिला प्रियकर शेख चांद शेख बक्षी याचे या महिलेसोबत आधी प्रेम प्रकरण होते आणि त्यांच्यात आर्थिक वाद झाल्यानंतर त्याचा या महिलेसोबत दुरावा आला होता. 

संबंधित महिलेचे त्यानंतर अशोक भालेराव यांच्यासोबत सुत जुळले आणि याची माहिती शेख चांद याला लागली आणि त्यातून त्याने अशोकला संपवण्याचा प्लॅन केला. जिलेटिनच्या कांड्या आदल्या दिवशीच टपरी खाली लावल्या आणि त्यानंतर 200 मीटरपर्यंत वायर अंथरून बॅटरीने करंट देऊन स्फोट देखील केला मात्र अशोक भालेराव हा यात थोडक्यात बचावलेला आहे. अशोक भालेराव याचे खरे नाव योगेश काळे असून त्याच्यावर देखील यापूर्वी गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. बनावट आधार कार्ड देखील त्याने बनवल्याचे समोर आलेले असून त्याच्यावरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 


शेअर करा