संपदाताईंची ठेव चाळीस हजारांची जमीन हवी दीड कोटींची ? , वकील महिलेकडून पत्रकारास धमकी

शेअर करा

संपदा पतसंस्थेच्या वसुली पथकाकडून सध्या मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कामकाज सुरू असून अनेकदा नगर चौफेर प्रतिनिधीने तक्रारी करूनही कामकाजात कुठलीही सुधारणा झालेली नाही उलट ठेवीदारांच्या वतीने खांद्यावर बंदूक लढवून पत्रकारांचा देखील आवाज दडपण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. ठेवीदारांच्या ठेवी मिळाल्याच पाहिजेत मात्र ठेवीदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भलतेच लोक गबर होत असून हा देखील एका अर्थी ठेवीदारांवर अन्यायच आहे . 

पारनेर तालुक्यातील एका ठिकाणी संपदा पतसंस्थेच्या वसुली पथकाकडून ताबा घेणेविषयी पंधरा तारखेला कारवाई ठेवण्यात आलेली होती. सदर कारवाई न्यायप्रविष्ठ प्रकरण असताना करण्यात येत असल्याने बेकायदेशीर असल्याचा आरोप करत संबंधित मयत संचालकाच्या कुटुंबीयांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे धाव घेतली आणि त्या संदर्भात जिल्हा उपनिबंधक यांना देखील नाशिक येथील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश होते मात्र तरीही पोलीस बंदोबस्त घेऊन ताब्याची प्रक्रिया एकतर्फी सुरू करण्यात आली.

नगर चौफेर प्रतिनिधी यांच्याकडे संबंधित संचालकाने हा प्रकार गैरप्रकार असल्याचे सांगत कागदपत्रे दाखवत धाव घेतलेली होती त्यावेळी नगर चौफेर प्रतिनिधी संबंधित वसुली अधिकारी यास कागदपत्रे दाखवत असतानाच एका वकील महिलेने पत्रकाराचा मोबाईल घेऊन आमच्या ‘ संबंधित बातमी द्यायची नाही  ‘ अशी धमकी दिलेली आहे. पत्रकार त्यांना समजावून सांगत असतानाच महिलेने अंगावर धावून येत ‘ आमच्याबद्दल बातम्या द्यायच्या नाहीत आमचे पैसे गेलेले आहेत ‘ असे सांगत धमकी दिलेली आहे. पत्रकार त्यांना पैसे गेलेले आहेत तर ते कायदेशीर मार्गाने मिळवा मात्र कागदपत्राची हेराफेरी आणि बनावट कागदपत्रे बनवून मिळवू नका असे समजून सांगत होता मात्र वकील महिलेने अखेर पत्रकाराच्या हातातील मोबाईल हिसका देऊन खाली पाडला.

पत्रकाराने संबंधित महिला यांस ठेविदारांना पैसे मिळाले नाहीत वकिलांनीही फी घेतलेली नाही असे तुम्ही म्हणता मग नक्की रक्कम गेली कुणाकडे ? असा प्रश्न विचारला त्यावेळी त्यांच्याकडे उत्तर नव्हते. संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भलतेच व्यक्ती गबर होत आहेत असे नगर चौफेर प्रतिनिधी त्यांना कागदांसहित पटवून देण्याचा प्रयत्न करत होता मात्र संबंधित महिलेने ‘ आमच्याबद्दल काहीही लिहायचे नाही ‘ असे म्हणत मोबाईल घेऊन फेकून दिला. आपल्याकडून झालेली चूक लक्षात आल्यानंतर या महिलेने माफी देखील मागितली आहे. 

कुठलाही लिलाव देण्याआधी संबंधित जमिनीचा ताबा हा त्या विभागाकडे असायला हवा मात्र त्याही नियमाला तिलांजली देत आधी लिलाव आणि त्यानंतर ताबा प्रक्रिया असा प्रकार करण्यात आलेला आहे. आणखीन उल्लेखनीय बाब अशी की ज्या दीड कोटी रुपयांच्या जागेचा ताबा ज्या जागेचा ताबा घेण्यासाठी  वसुली अधिकारी एका महिलेला घेऊन आले होते त्या महिलेची संपदा पतसंस्थेत अवघी 40000 रुपयांची ठेव आहे अशीही चर्चा आहे . 

स्वतःची चाळीस हजार रुपयांची ठेव असताना संबंधित महिलेला आज बाजार मूल्य असलेली दीड कोटी रुपयांची जमीन हडप करायची होती. ताबा घेण्यासाठी ज्या दोन पोलिसांना बोलवण्यात आलेले होते त्यांच्या चारचाकी गाडीवर कुठलाच नंबर नव्हता आणि गाडीच्या बोनेटवर पोलीस लिहिलेली प्लेट होती. नगर चौफेर प्रतिनिधीने प्रश्न विचारला त्यावेळी या वकील महिलेने ‘ आमच्याबद्दल कुठे काही लिहायचे नाही अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत ‘ अशा स्वरूपाची धमकी दिलेली आहे. 


शेअर करा