नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात ‘ त्या ‘ तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

शेअर करा

नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात 15 तारखेला सुनावणीच्या वेळी या प्रकरणातील आरोपी अविनाश प्रभाकर वैकर, प्रवीण सुरेश लहारे आणि प्रदीप जगन्नाथ पाटील या तीनही जणांचे जामीन फेटाळण्यात आलेले आहेत. यातील दोन व्यक्ती हे कर्जदार असून एक व्यक्ती संस्थेतील माजी अधिकारी आहे. 

नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या दहा आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले असून तब्बल आठ हजार पानांमध्ये हे दोषारोपपत्र न्यायालयासमोर मांडण्यात आलेले आहे. सुरुवातीला 150 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची फिर्याद कोतवाली पोलिसात दाखल करण्यात आलेली होती मात्र फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हा आकडा तब्बल 291 कोटी पर्यंत पोहोचला. 

नगर अर्बन बँक बचाव कृती समितीच्या वतीने यापूर्वीच एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले असून त्यामध्ये ‘ आम्हाला आरोपी सापडत नाहीत ‘ या पोलिसांच्या नेहमीच्या उत्तराबद्दल नाराजी व्यक्त करत ठेविदारांना आरोपींच्या अटकेबद्दल पाठपुरावा करण्यासाठी सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. 

अर्बन बँकेचा फॉरेन्सिक रिपोर्ट देखील अद्याप अपूर्ण असून त्यात जालना येथील बगाडिया नावाच्या मोठ्या कर्जदाराचा आरोपीत अजून समावेश करण्यात आलेला नाही याकडे देखील लक्ष वेधण्यात आलेले आहे. सखोल तपास केला तर अजूनही सुमारे वीस ते पंचवीस आरोपी यांची संख्या वाढेल मात्र त्यांना अटक कधी होईल याविषयी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. 

तीन मे 2024 रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून या उपोषणात सहभागी होण्यासाठी 9665739682 या मोबाईल नंबरवर संपर्काचे आवाहन डी एम कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आलेले आहे. 


शेअर करा