नगरमध्ये 93 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ,  स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

शेअर करा

निवडणूक आचारसंहिता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा सपाटा सातत्याने लावलेला असून नगर शहरात राजस्थान येथील असलेल्या दोन व्यक्तींकडून तब्बल 93 लाख 50 हजार रुपयांचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आलेली आहे. दागिन्यांची विक्री करण्यासाठी हे दोघे नगरमध्ये आलेले होते त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली. 

उपलब्ध माहितीनुसार , रमेशसिंह हेरसिंह राजपूत ( वय 47 राहणार पाली राजस्थान ) आणि नारायण लाल हेमराज गाडरी ( वय 27 राहणार अकोला राजस्थान ) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून यापूर्वी देखील नगर शहरात अशाच स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली होती. 

स्थानिक गुन्हे शाखेला दोन्ही आरोपी अधिकृत बिले नसताना तब्बल 93 लाखांचा मुद्देमाल विक्री करण्यासाठी नगर शहरात येणार आहेत या संदर्भात गुप्त सूत्रांच्या माध्यमातून माहिती मिळालेली होती. 

मुख्य आरोपी असलेला राजपूत याला ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याच्या गाडीत 91 लाख 78 हजार रुपये किमतीचे दागिने आणि 34 हजार 700 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली तर दुसरा आरोपी गाडरी याच्याकडून 36 हजार पाचशे रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे . 


शेअर करा