आदिवासी महिलेची जागा हडप प्रकरण ,  नगरमधील उद्योजकासह 13 जणांवर गुन्हा दाखल

शेअर करा

फसवणुकीचा एक अद्भुत असा प्रकार नगर शहराजवळ समोर आलेला असून नगर तालुक्यातील हे प्रकरण आहे . निंबळक शिवारातील इतर हक्कदारांची नावे कागदोपत्री कमी करून आदिवासी समाजासाठी राखीव असलेल्या शेत जमिनीचा अपहार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर तब्बल 13 जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

उपलब्ध माहितीनुसार , सिंधू मुरलीधर निकम ( राहणार निंबळक तालुका नगर ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिलेल्या असून दिनेश भगवानदास छाब्रिया ( वय 47 राहणार सावेडी ) , सरला भगवानदास छाबरिया ( वय 77 राहणार सावेडी ),  शिवाजीराव आनंदराव  फाळके ( वय 65 राहणार तालुका कर्जत ), आशिष रमेश पोखरणा ( वय 40 राहणार सर्जेपुरा ), जयवंत शिवाजीराव फाळके ( वय 39 राहणार तालुका कर्जत ), आकाश राजकुमार गुरुनानी ( वय 29 राहणार सावेडी ), माणिक आनंदराव पलांडे ( वय 55 राहणार पुणे ) अजय रमेश पोखरणा ( वय 45 राहणार सर्जेपुरा ), गौतम विजय बोरा ( वय 48 राहणार कापड बाजार अहमदनगर ) आणि नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया ( वय 45 राहणार डीएसपी चौक अहमदनगर ) तसेच कामगार तलाठी हरिश्चंद्र विजय देशपांडे ( वय 47 राहणार निंबळक तालुका नगर मंडल अधिकारी ) आणि सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन आणि एक अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.


शेअर करा