निलेश लंकेंची पारनेरकरांना भावनिक साद , म्हणाले की माझे भवितव्य.. 

शेअर करा

निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर इथे बोलताना , ‘ इतर तालुक्याचे नेते आपल्या मतदारसंघात आमदार खासदार झाले. आपल्या तालुक्यातील माणूस खासदार झाला तर इतिहासात नोंद होईल . तालुक्याचा स्वाभिमान जपा माझे भवितव्य तुमच्या हातात आहे अशी संधी पुन्हा येणार नाही , ‘ अशी भावनिक साथ मतदारांना घातलेली आहे. 

टाकळी ढोकेश्वर येथील कटारिया सभागृहात बोलताना निलेश लंके म्हणाले की . ‘ मी आमदार झाल्यानंतर 24 तास मतदार संघासाठी दिलेले आहेत. दिवस रात्र विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा केला तो निधी देखील अडवण्याचे काम विखे कुटुंब यांनी केले . निवडणुका आल्या की त्यांना जनता आठवते. तालुक्यातील केवळ चार घरे त्यांनी जोडली पाचवे घर कधी सोबत जोडले नाही . आता ही तुमची आणि माझी अस्तित्वाची लढाई आहे. काही कमी जास्त झालं तर आपल्याला राजकारणात सर्वांना पुनर्विराम द्यावा लागेल ‘ असे म्हणत मतदारांना तुतारी चिन्हाचे बटन दाबण्याचे आवाहन केलेले आहे.


शेअर करा