तब्बल पाच जणांवर मकोका अंतर्गत कारवाई , सर्वजण प्रवरानगरचे

शेअर करा

नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात मोका कायद्याअंतर्गत पाच जणांवर कारवाई करण्यात आलेली असून आरोपींवर आत्तापर्यंत तब्बल 19 वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार , अमर बाळू भोसले , अनिकेत उर्फ देवेंद्र जया भोसले , ऋषिकेश उर्फ भैय्या बाबासाहेब सरोदे , आदित्य बाळासाहेब गायकवाड, मयूर उर्फ अनिकेत विठ्ठल आल्हाट अशी मोका कारवाई झालेल्या आरोपींची नावे असून सर्वजण प्रवरानगरचे रहिवासी आहेत. 

सदर टोळीतील म्होरक्या अमर भोसले ( वय वीस ) हा टोळीतील इतर व्यक्तींसोबत परिसरात आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण करायचा . त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न , गंभीर दुखापत तसेच जबरी चोरी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल होते मात्र तरीही त्याच्या वर्तनात काहीही बदल झाला नाही म्हणून मोका अंतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आलेली होती. त्या संदर्भातील प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवण्यात होता त्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.


शेअर करा