शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली चुना लावून फरार , गुंतवणूकदारांनी फोडलं कार्यालय

शेअर करा

शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली जिल्हाभरात सध्या धुमाकूळ सुरू असून शेअर मार्केटच्या नावाखाली परिसरातील तरुणांना हेरत त्यांना शेअर मार्केटमध्ये अडकवायचे आणि त्यानंतर लुबाडणूक करून फरार व्हायचे असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. शेवगाव तालुक्यातील अंतरवाली इथे असाच प्रकार समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी या ट्रेडरच्या कार्यालयावर धाव घेत त्याचे कार्यालय फोडून टाकले. पंधरा तारखेला सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , संबंधित शेअर ट्रेडर याने अंतरवाली येथे स्वतःचे कार्यालय खोलत चार महिन्यांमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळवून देतो असे सांगत काही कोट्यावधींना नागरिकांना गंडा घातलेला आहे . सुरुवातीला व्याजाचा पैसा वेळेत मिळत गेला त्यामुळे अनेक जण या ट्रेडरच्या जाळ्यात अडकले आणि त्यानंतर त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरू केली. 

काही दिवसांपूर्वी हा व्यक्ती अचानकपणे गावातून गायब झाला आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने मी तुमचे पैसे देणार आहे मला आणखीन काही वेळ द्या असे सांगत व्हिडिओ पाठवले मात्र अखेर तो गायब झाला . संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत फसवणूक झाल्याचे तक्रार आमच्याकडे आलेली नाही तक्रार आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे 


शेअर करा