‘ माणूस कुठून आणायचा ? तुतारी वाजवून टाका संपलं सगळं ‘ , सुजय विखे म्हणाले की.. 

शेअर करा

खासदार सुजय विखे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये ते ‘ आमची अडचण होत असेल तर तुतारी वाजवून टाका ‘ असे म्हणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके हे सुजय विखे यांचे मुख्य प्रतिस्पर्धी असून निलेश लंके यांचे चिन्ह तुतारी असे आहे. 

जिल्ह्यात एका ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक होती त्यावेळी मार्गदर्शन करताना म्हणतात की सुजय विखे पाटील मार्गदर्शन करताना म्हणतात की , ‘ तुमच्या जीवावर आम्ही राजकारण करतो. आज भाजपचा कार्यकर्ता समाजात वावरत असताना काय बोलतो याला महत्त्व आहे. प्रत्येकाला सगळेच मान्य आहेत का तर नाही . काही लोकांना सुजय विखे मान्य नसतील तर मोदींचे नाव सांगा. आम्ही दोघे मान्य नसतील तर ताईंचे नाव सांगा . तिघेही मान्य नसतील तर अरुण मुंडे यांचे नाव सांगा. आमच्या सगळ्यांचीच नावे मान्य नसतील तर तुतारी वाजवून टाका संपलं .. याच्या पलीकडे आता काय करणार माणूस कुठून आणायचा ? ‘ असे सुजय विखे म्हणाले आहेत. 

सुजय विखे यांनी अशाच पद्धतीने अनेक वक्तव्ये आधी देखील केलेली आहेत. काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी पंधरा लाख रुपये या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केलेली होती . ‘ असे कोण कोणाला पंधरा लाख रुपये देते का ? ‘ असे म्हणत सुजय विखे यांनी म्हटल्याचा व्हिडिओ त्यावेळी जोरदार व्हायरल झालेला होता. 


शेअर करा