‘ कम से कम दो लाख ‘  ,  सुजय विखेंच्या ‘ त्या ‘ वक्तव्यानंतर वारचं फिरलं

शेअर करा

निलेश लंके यांच्या प्रचाराचा झंझावात काल नगर शहरात दाखल झालेला असून नगरकरांकडून त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. निलेश लंके यांनी काल नगर शहरातील विविध भागात भेट देऊन जनसंवाद यात्रेच्या माध्यमांतून नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले.  

निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेत मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सामील झालेल्या असून शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी निलेश लंके यांची भूमिका जाहीर होताच मोठ्या प्रमाणात लंके यांच्यासाठी आपली प्रचार यंत्रणा सक्रिय केलेली आहे.  महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकजूट असल्याचे दिसत असून ‘ कमीत कमी दोन लाख ‘ या घोषणेसह जनसंवाद यात्रेत महाविकासचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. 

दुसरीकडे खासदार डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच काही प्रमाणात नाराजी भाजपमध्ये दिसून येत होती आणि त्यानंतर शेवगाव इथे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यावर ही बाब चव्हाट्यावर आली. उरली सुरली कसर सुजय विखे यांनी बोलताना ‘ तुतारी वाजवून टाका ‘ असे  म्हणत भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याची कबुली दिली. भाजपच्या अंतर्गत गोटात मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरु असून सुजय विखे यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज असलेले कार्यकर्ते समोर दाखवत नसले तरी आतून तुतारीचे काम करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

निलेश लंके यांचा झंझावाती दौरा आजही नगर शहरात असून त्यांच्या दौऱ्याचे टाईम टेबल सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. सावेडी फकीरवाडा भिंगार या परिसरात निलेश लंके यांचा दौरा आज दुचाकीवर राहणार असून तुतारी चिन्हासाठी मतदानाचे आवाहन महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. 


शेअर करा