‘ नाद करायचा नाय ‘, निलेश लंके यांची जनसंवाद यात्रा नेमकी कशी आहे ? 

शेअर करा

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आज नगर शहरात दुसरा दिवस असून सावेडी परिसरातील तपोवन मंदिरात आज दर्शन घेऊन निलेश लंके यांनी आजच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केलेला आहे. महाविकास आघाडीच्या शहरातील विविध नेत्यांसोबत नागरिकांचे देखील त्यांना प्रचंड समर्थन मिळताना दिसत आहे. 

निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर तुतारी चिन्हावर सध्या ते निवडणूक लढवत असून मतदारसंघात त्यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सुरू केलेली आहे.  प्रत्येक गावात तसेच शहरात त्यांची ही जनसंवाद यात्रा सुरू असून जनसंवाद यात्रा सुरू असली तरी तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी देखील ते वेळ देत आहेत ही बाब नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. 

आज सकाळी तपोवन रोड येथील तपोवन मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी यात्रेचा आजच्या यात्रेचा शुभारंभ केलेला असून शहरातील सावेडी , फकीरवाडा आणि भिंगार या प्रभागात त्यांची ही जनसंवाद यात्रा आज सुरु राहणार आहे. जनसंवाद यात्रेच्या प्रारंभी निलेश लंके यांच्या प्रचारार्थ गाणे त्या पाठोपाठ उघड्या चारचाकी  जीपमध्ये उभे असलेले निलेश लंके आणि त्यांच्यासोबत मोजके कार्यकर्ते आणि त्या पाठोपाठ दुचाकी आणि चार चाकी गाड्यांचा ताफा असे या जनसंवाद यात्रेचे स्वरूप आहे. ‘ नाद करायचा नाय ‘ हे निलेश लंके प्रचारार्थ बनवलेले गाणे या यात्रेत मोठ्या प्रमाणात वाजवले जात आहे. 

महाविकास आघाडीचे शहरातील अनेक नेते यामध्ये सहभागी झालेले असून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे , शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते विक्रम राठोड , शरद पवार गटाचे नेते अभिषेक कळमकर , प्रकाश पोटे यांच्यासोबत बाळासाहेब बोराटे , संजय झिंजे तसेच महाविकास आघाडीत कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते आणि नेते रणरणत्या उन्हात या यात्रेत सहभागी झालेले आहेत. कमीत कमी दोन लाख लीड मिळवण्याच्या उद्देशाने निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेले असून त्यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांसोबतच नागरिकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.


शेअर करा