निलेश लंकेंनी घाम फोडला ,  सुजय विखे यांच्या फेसबुक पेजवरच लंकेंना समर्थन

शेअर करा

खासदार सुजय विखे आणि निलेश लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून एकमेकांचे मुख्य प्रतिस्पर्धी असून सुजय विखे हे भाजपच्या तिकिटावर तर निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.  नगर दक्षिणची निवडणूक ही प्रामुख्याने या दोघांमध्ये असून विद्यमान खासदार असलेले सुजय विखे यांचा जनसंपर्क मागील काही वर्षात अत्यंत कमी झाला असल्याकारणाने त्याचे प्रतिबिंब सुजय विखे यांच्या फेसबुक पेजवर उमटत असल्याचे दिसून येत आहे.

सुजय विखे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ‘ जनतेचा निर्धार पुन्हा तोच खासदार ‘ अशी पोस्ट केलेली होती. सुजय विखे यांच्या या पोस्टवर कमेंट येण्यास सुरुवात झालेली असून सुमारे ६० टक्के कमेंट ह्या सुजय विखे यांच्याच विरोधात अर्थात निलेश लंके यांच्यासाठी समर्थन देणाऱ्या आहेत.  पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणात निलेश लंके यांना जनसमर्थन असले तरी अहमदनगर शहर आणि इतर तालुक्यांसाठी ते काही प्रमाणात का होईना नवीन चेहरा आहेत तसेच निलेश लंके हे प्रस्थापित घराण्यातून आलेले नसल्याने नागरिकांची एक सुप्त सहानुभूती लंके यांच्या भोवती आढळून येत आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आज नगर शहरात दुसरा दिवस असून सावेडी परिसरातील तपोवन मंदिरात आज दर्शन घेऊन निलेश लंके यांनी आजच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केलेला आहे. महाविकास आघाडीच्या शहरातील विविध नेत्यांसोबत नागरिकांचे देखील त्यांना प्रचंड समर्थन मिळताना दिसत आहे. 

निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर तुतारी चिन्हावर सध्या ते निवडणूक लढवत असून मतदारसंघात त्यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सुरू केलेली आहे.  प्रत्येक गावात तसेच शहरात त्यांची ही जनसंवाद यात्रा सुरू असून जनसंवाद यात्रा सुरू असली तरी तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी देखील ते वेळ देत आहेत ही बाब नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. 

आज सकाळी तपोवन रोड येथील तपोवन मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी यात्रेचा आजच्या यात्रेचा शुभारंभ केलेला असून शहरातील सावेडी , फकीरवाडा आणि भिंगार या प्रभागात त्यांची ही जनसंवाद यात्रा आज सुरु राहणार आहे. जनसंवाद यात्रेच्या प्रारंभी निलेश लंके यांच्या प्रचारार्थ गाणे त्या पाठोपाठ उघड्या चारचाकी  जीपमध्ये उभे असलेले निलेश लंके आणि त्यांच्यासोबत मोजके कार्यकर्ते आणि त्या पाठोपाठ दुचाकी आणि चार चाकी गाड्यांचा ताफा असे या जनसंवाद यात्रेचे स्वरूप आहे. ‘ नाद करायचा नाय ‘ हे निलेश लंके प्रचारार्थ बनवलेले गाणे या यात्रेत मोठ्या प्रमाणात वाजवले जात आहे. 

महाविकास आघाडीचे शहरातील अनेक नेते यामध्ये सहभागी झालेले असून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे , शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते विक्रम राठोड , शरद पवार गटाचे नेते अभिषेक कळमकर , प्रकाश पोटे यांच्यासोबत बाळासाहेब बोराटे , संजय झिंजे तसेच महाविकास आघाडीत कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते आणि नेते रणरणत्या उन्हात या यात्रेत सहभागी झालेले आहेत. कमीत कमी दोन लाख लीड मिळवण्याच्या उद्देशाने निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेले असून त्यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांसोबतच नागरिकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.


शेअर करा