नगरमध्ये सातत्याने विजेचा लपंडाव , नागरिक झाले घामाघूम

शेअर करा

नगर शहरात तसेच उपनगरात सध्या विजेचा प्रचंड खेळखंडोबा सुरू झालेला आहे. एकीकडे उन्हाळ्याने नागरिकांना पंखे कुलर आणि एसी यांची गरज भासत आहे तर दुसरीकडे सातत्याने ये जा करणाऱ्या वीजपुरवठ्याने नागरिक घामाघूम झालेले आहेत. 

सद्य परिस्थितीत खंडित होणारा वीज पुरवठा हा व्यवसायाच्या प्लॅनिंगवर तसेच दिवसभराच्या कामाच्या नियोजनासाठी देखील मोठा अडथळा ठरत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणकडून थोड्या वेळात वीज सुरळीत होईल असे सांगण्यात येते मात्र प्रत्यक्षात महावितरणच्या शब्दावर आता नागरिकांना विश्वासच राहिलेला नाही. 

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सध्या घरातील पंखे , कुलर,  एसी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करत असल्याने ट्रांसफार्मरवर लोड येतो आणि त्यामुळे सतत विद्युत पुरवठा खंडित होतो अशी कारणे देण्यात येत आहेत. 


शेअर करा