सोशल मीडियात ‘ तशी ‘ पोस्ट दिसली की फिरवा फोन , नगर सायबरकडून नंबर जाहीर 

शेअर करा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व राजकीय पक्ष सध्या सक्रिय असून फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम यावर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल केल्या जातात. सद्य परिस्थितीत चालू घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलिसांकडून 9156438088 हा नंबर जारी करण्यात आला असून सोशल मीडियातून कुणाची बदनामीकारक पोस्ट तसेच अफवा आढळून आल्यास या नंबरवर संपर्काचे आवाहन अहमदनगर सायबर पोलिसांकडून करण्यात आलेले आहे. 

अनेक व्हाट्सअप ग्रुपमध्ये वैयक्तिक तसेच राजकीय टीकाटिप्पणी सुरू असते त्यातून एकमेकांना शिवीगाळ केल्याचे देखील प्रकार घडतात तसेच विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी खोट्या बातम्या देखील पसरवल्या जातात या पार्श्वभूमीवर अशा पोस्ट आढळल्यास संपर्काचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.


शेअर करा