शेवगावमधून तीन मुलींचे अपहरण करणारा ‘ पोपट्या ‘ अखेर इथं सापडला

शेअर करा

नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात अपहरण करण्यात आलेल्या तीनही अल्पवयीन मुलींची पोलिसांनी सुटका केलेली असून आरोपीला देखील बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केलेली असून अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्यानंतर शेवगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. 

उपलब्ध माहितीनुसार , पोपट्या शहादेव बोरुडे ( वय वीस वर्षे ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून 19 एप्रिलला आरोपीने मुलींना आमिष दाखवत यांचे अपहरण केलेले होते. पोलिसांनी शेवगाव ते अहमदनगर रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यावेळी आरोपी हा या तीनही मुलींना घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेले होते. 

एकीकडे शेवगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील समांतर तपासासाठी कार्यरत होते. सुपा परिसरातील एका महिलेने फोनवरून आरोपी तसेच तीन मुली संदर्भात पोलिसांना माहिती दिली त्यानंतर सुपा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन तीनही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. तब्बल 300 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून अखेर कारवाई करत आरोपीला जेरबंद केल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


शेअर करा