रयत समाचारकडून ‘ शाहिरी जलसा ‘, आज संध्याकाळी माऊली संकुलला होणार कार्यक्रम

शेअर करा

कामगार दिनाचे औचित्य साधत आज नगर शहरातील सावेडी परिसरातील माऊली संकुल येथे लोकशाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा कार्यक्रम नगर शहरातील रयत समाचार या वृत्तपत्राने आयोजित केलेला असून आज संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम माऊली संकुल झोपडी कँटीन इथे विनामूल्य आहे.

शाहिरी जलसा कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भैरवनाथ वाकळे , दिगंबर भोसले व रयत समाचारची टीम यांच्या वतीने करण्यात आलेले असून संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम माऊली संकुल येथे होणार आहे.


शेअर करा