
कौटुंबिक मनोरंजनासाठी प्रसिद्ध असलेल्या निर्मात्या एकता कपूर आणि शिबा कपूर यांच्या विरोधात एका वेब सिरीजमध्ये अल्पवयीन मुलीचे अश्लील दृश्य चित्रित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बालाजी टेलीफिल्मने 2017 मध्ये एका वेब सिरीजची निर्मिती केलेली होती त्यानंतर याच मालिकेचा पुढील भाग 2020 मध्ये प्रदर्शित झाला त्यावेळी या मालिकेत अल्पवयीन मुलींचे असलेले दृश्य चित्रित करण्यात आलेले होते. मुंबई पोलिसांनी हा प्रकार समोर आल्यानंतर अल्ट बालाजी टेलिफिल्म्स तसेच एकता कपूर आणि शिबा कपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.