छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकर याला कोल्हापुर येथील न्यायालयात हजर करण्यात आलेले होते त्यावेळी त्याची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मंगळवारी एक तारखेला कोरटकरच्या जामीनासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करत प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावले होते. त्यानंतर प्रशांत कोरटकर हा पळून गेलेला होता मात्र त्याला तेलंगाना येथून ताब्यात घेण्यात आले.
प्रशांत कोरटकर याला न्यायालयात हजर करते वेळी शिवभक्तांचा संताप पाहता प्रशांत कोरटकर याच्या जीविताला धोका असल्याने कोल्हापूर न्यायालयात चक्क कोल्हापुरी चप्पल पायात घालून येण्यास मनाई करण्यात आलेली होती.