वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादात सापडलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची अखेर बदली करण्यात आलेली आहे. अकार्यक्षम आणि वादग्रस्त कारकीर्द असणाऱ्या व्यक्तींची या पदावर रवानगी करण्यात येत असते .जालिंदर सुपेकर यांची आता उप महासमादेशक होमगार्ड या पदावर बदली करण्यात आली आहे.
शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचा मामा म्हणून तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांचं नाव समोर आलं होत . हगवणेंना मिळालेल्या शस्त्र परवान्यांवर मामा सुपेकरची सही होती. हगवणे बंधूंना शस्त्रपरवाने मिळवून देण्यासाठी खोटे पत्ते दिल्याच माहिती असूनही हगवणे यांना परवाने मिळवून दिल्याचा आरोप सुपेकर यांच्यावर आहे.
हगवणे कुटुंबाचा जवळचा असलेल्या निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक करण्यात आलेली होती सध्या तो पोलीस कोठडीत असून वैष्णवी हगवणे हिच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या वकिलाच्या विरोधात सोशल मीडियात देखील संताप पाहायला मिळत आहे. वैष्णवी हिच्या वडिलांना कॅमेरासमोर बोलतानाच अक्षरशः अश्रू अनावर झालेले होते.