चाणक्य चौक ते आदर्श कॉलनी रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ , रस्त्यांची नावे ठरली 

शेअर करा

सभापती मीनाताई चोपडा यांच्या पाठपुराव्यातून आणि संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून चाणक्य चौक ते आदर्श कॉलनी रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. 

आदर्श कॉलनीतील दोन्ही रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम सुरू झाले असून, हे रस्ते ‘कुंदन कांकरिया पथ’ व ‘राजेंद्र मुनोत पथ’ अशा नामांनी ओळखले जाणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांच्या कामांना आता गती मिळाली असून या कामांमुळे कॉलनीतील नागरिकांचा जुना प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत आहे.

शुभारंभ प्रसंगी आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत मा. उपमहापौर गणेश भोसले, मा. नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, डॉ. बलराज पाटील, सी.ए. अशोक पितळे, अभय कांकरिया, संजय ताथेड, राजू शेटिया, बाळू धाडीवाल, संजू गुंदेचा, किशोर डागा, सावन गुगळे, संदीप शिंगवी, डॉ. अजय देशमुख, प्रतीक पाचपुते, विशाल दाभाडे, दिनेश भंडारी, गौरव झंवर आदी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शेअर करा