धनंजय मुंढे प्रकरण : रेणू शर्माच्या वकिलावरच विनयभंगाचा गुन्हा अन निघाले भाजपचे चौकीदार

शेअर करा

धनंजय मुंढे प्रकरणात चर्चेतील महिला रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी हे भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी असल्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या नावाचे चौकीदार रमेश त्रिपाठी असे फेसबुक पेजसुद्धा दिसत आहे. रमेश त्रिपाठी यांचे वाशी येथील 17 प्लाझा याठिकाणी कार्यालय असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहेत तर भाजपच्या सवयीप्रमाणे नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी ते भाजपचे पदाधिकारी नसल्याचे सांगत हात वर केले आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांच्याबाबत आता विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. त्यांच्यावर 2018 साली वाशीच्या एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतेय. आपल्या महिला असिस्टंट वकिलावर विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप असून, त्यांच्यावर कलम 354 ( अ ) च्या कलमाखाली गुन्ह्य दाखल असल्याचंही समजतंय. याच प्रकरणावर येत्या 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

तक्रारदार महिला रेणू शर्मा यांनी डीएन नगर पोलीस ठाण्याला काल (14 जानेवारी) भेट दिली होती. यावेळी त्यांनी सहायक आयुक्त यांच्यासमोर जबाब नोंदविला. यावेळी रेणू शर्मा यांच्या वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी उपस्थित होते. पण आता रमेश त्रिपाठींवरच विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रेणू शर्मांबरोबरच आता त्यांचे वकील रमेश त्रिपाठींच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

रमेश त्रिपाठी यांची फेसबुक टाइमलाईन चेक केली असताना त्यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार रमेश त्रिपाठी असे लिहलेले असून त्यांच्या बहुतांश पोस्ट ह्या भाजपच्या समर्थनार्थ लिहलेल्या आहेत तर योगी आदित्यनाथ यांचे देखील तोंड भरून कौतुक केलेले आहेत तर एका पोस्टमध्ये पालघर मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारवर देखील निशाणा साधलेला आहे तर ट्विटरवरील अकाउंटवरून देखील रमेश त्रिपाठी हे भाजपचे कट्टर समर्थक असल्याचे स्पष्ट होत आहे .


शेअर करा