.. आणि म्हणून चार किलो मातीच्या बदल्यात दिले ४८ तोळे सोने अन ३० लाख रुपये

शेअर करा

कोण कशावर विश्‍वास ठेवेल, याचा काही नेम राहिलेला नाही. तिघांनी मिळून एका सराफी व्यावसायिकास बंगालमधील मातीचे सोने होते, अशी बतावणी केली. सराफ व्यावसायिकानेही त्यावर आंधळेपणाने विश्‍वास ठेवला. त्यानंतर त्या तिघांनी सराफी व्यावसायिकाला चार किलो माती देऊन एक, दोन नव्हे तर तब्बल 50 लाख रुपयांना गंडा घातला. हा धक्कादायक प्रकार पुणे इथे घडला असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विपुल नंदलाल वर्मा (वय 39, रा. हडपसर ) यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. त्यावरुन मुकेश चौधरीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विपुल शर्मा यांचे हडपसरमध्ये पवन ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. तर आरोपी चौधरी हा मूळचा हरियाणा येथील आहे. त्याचा गायी आणि दुग्धपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे.

अंगठी खरेदीच्या निमित्ताने त्याची फिर्यादीशी ओळख झाली होती, त्यानंतर त्यांच्यामध्ये घरगुती संबंध निर्माण झाले. त्यानंतर चौधरी व त्याच्यासमवेतच्या अन्य दोघांनी संगनमत केले. त्यासाठी त्यांनी फिर्यादीस वेळोवेळी पनीर, तांदूळ धान्य देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादींच्या विपूलच्या वडिलांशी जवळीक साधून आमच्याकडे बंगाल येथून आणलेली माती आहे, माती गरम केल्यानंतर त्याचे सोने होते अशी बतावणी केली.

सुरुवातीला वर्मा यांनी त्यावर विश्वास ठेवला नाही मात्र त्यानंतर तिघांनी हातचलाखीने माती गरम करण्याच्या बहाण्याने सोने काढून दाखवले, यानंतर वर्मा यांचा चौधरी याच्यावर विश्वास बसला त्यानंतर आरोपी चौधरीने फिर्यादीस घरातील लग्न असल्याचे सांगत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्याबदल्यात त्याने बंगाल येथून आणलेली चार किलो माती त्यांना दिली आणि ही माती गरम केल्यास हिचे सोने होते असे देखील सांगितले. त्याबदल्यात वर्मा यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे 48 तोळे दागिने सोन्याचे आणि 30 लाखाची रोकड घेतली.

काही दिवसांनी ती माती गरम करून सराफ व्यावसायिकाने तिच्यापासून सोने तयार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सोने काही तयार झाले नाही.याच दरम्यान आरोपी यांनी वर्मा याच्याशी संपर्क देखील तोडून टाकला. मातीचे सोने झाले नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आल्यानंतर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सौरव माने तपास करत आहे.


शेअर करा