भांडण होताच घेतला ‘ नको ‘ तिथे चावा मात्र त्यानंतर ..: कुठे घडली घटना ?

शेअर करा

केरळमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. बारमध्ये भांडण झाल्यानंतर एका तरुणाने ५५ वर्षीय व्यक्तीच्या गुप्तांगाला चावा घेतला. ही घटना कुन्नाथुर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी २८ वर्षीय युवकाला अटक केली असून त्याचे नाव ‘ शरीफ ‘ असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, कुन्नाथुर येथील एका बारमध्ये शरीफ आणि ५५ वर्षीय सुलेमान यांच्यात भांडण झाले. शरीफने रागाच्या भरात सुलेमानच्या गुप्तांगाला चावा घेतला. यात सुलेमान जखमी झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शरीफ याला अटक करण्यात आली आहे. सुलेमानला जखमी अवस्थेत त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

शरीफ हा पेरुंबादप्पू येथील रहिवासी आहे. तर सुलेमान हा पुन्नुक्कावु येथे राहतो. शनिवारी रात्री ही घटना घडली. शरीऱ ज्या टॅक्सीमधून बारमध्ये पोहोचला, त्याआधीच तिथे पार्क केलेल्या कारला टॅक्सीने धडक दिली. यावरून वाद सुरू झाला. शरीफ अधिकच आक्रमक झाला. लोकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याने रागाच्या भरात सुलेमान याच्या गुप्तांगाला चावा घेतला. या भांडणात मध्यस्थी करणारा बारमालक आणि कर्मचाऱ्यालाही दुखापत झाली आहे.


शेअर करा