हळदीच्या कार्यक्रमातच महिलेवर वार, वेगळेच ‘ रहस्य ‘ आले समोर

शेअर करा

कल्याणमधील सापर्डे येथे हळदी समारंभादरम्यान झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा झाला आहे. आधी आरोपीसोबत प्रेमसंबंध असलेली शेजारची महिला दुसऱ्यांकडे पाहते याच गोष्टीचा राग मनात धरत आरोपीने त्या महिलेचा खून केल्याचे उघड झाले आहे. अवघ्या 4 तासांत पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. सध्या आरोपी पवन म्हात्रे पोलिसांच्या ताब्यात आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कल्याणमधील सापर्डे गावात हळदी समारंभ सुरु होता. यावेळी रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सगळे हळदी समारंभात व्यस्त होते. यावेळी आरोपी पवन म्हात्रेने शेजारी राहत असलेल्या महिलेवर हल्ला केला. यावेळी आरोपीची आईसुद्धा हजर होती. हल्ला झाल्यानंतर शेजारच्या महिलेला वाचवण्यासाठी आरोपीची आई धावत गेली होती. या हल्ल्यात पवनची आईसुद्धा जखमी झाली तर हल्ला झालेल्या महिलेचा मृत्यू झाला.

पवनच्या घराशेजारील महिलेवर हल्ला झाल्यानंतर हा हल्ला चोरीच्या उद्देशातून झाल्याचा बनाव पवनने केला. यावेळी पवनही तेथे उपस्थित असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते मात्र या हल्ल्यात आरोपी पवन हा तिळमात्र जखमी झाला नव्हता. या प्रकारामुळे पोलिसांचा आरोपीवर संशय बळावला होता. त्या दिशेने पोलिसांनी आपला तपास सुरु केला.

गुप्त सूत्रांच्या माध्यमांतून पवनच्या अनैतिक संबंधाची माहिती पोलिसांना हाती लागली आणि कल्याणचे डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अनिल पोवार आणि सीनियर पीआई अशोक पवार या तिघांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जवळपास तीन तास आरोपी पवनची कसून चौकशी केली. त्यांनतर आपणच त्या महिलेची हत्या केल्याचे त्याने मान्य केले.

चौकशीनंतर आरोपी पवन म्हात्रे याने खळबळजनक खुलासे केले. आपणच मृत महिलेच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याचे त्याने कबुल केले. यावेळी पुढे सांगताना पवन आणि मृत्यू झालेली शेजारची महिला यांचे प्रेम संबंध होते. मात्र शेजारची महिला इतरांसोबतही मिळून मिसळून राहत असे. याच कारणामुळे माझ्यावर प्रेम आणि दुसऱ्यांकडे बघते, या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी पवनने महिलेची हत्या केली.


शेअर करा