पैशांसह चक्क शरीरसुखाची देखील तरुणीने दिली ‘ सुपारी ‘, महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

चक्क शरीरसुखाची सुपारी देऊन तरुणीने प्रियकराचा काटा काढल्याची खळबळजनक घटना नागपूर जिल्हयातील कुहीतील सालईमेंढा येथे घडली असून हत्याकांडाचा पर्दाफाश करीत स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी मारेकरी, तरुणी व तिच्या आई-वडिलाला बेड्या ठोकल्या. शारीरिक सुख व दीड लाख रुपयांची सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणण्यात आल्याचे तपासादरम्यान समोर आले.

चंदू गंगाधर महापूर (वय ३०, रा. पाचगाव) असे मयताचे नाव असून भारत वसंता गुजर (वय २५), प्रमोद (वय ५२) त्याची पत्नी पंचफुला (वय ४७) व मुलगी कल्याणी (वय २० वर्षे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. चंदू हा विवाहित असून श्रमिक होता तर भारत हा देखील शेत कामगार आहे सोबत तो ड्रायव्हर देखील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत चंदू आणि कल्याणीच्या मोठ्या बहिणीचे अनैतिक संबंध होते. काही वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले. त्यानंतर चंदू व (प्रेयसीची बहीण ) कल्याणी या दोघांत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. काही दिवसांपूर्वी कल्याणीला मुलगा बघायला आला. दोघांनी एकमेकांना पसंत केले. याबाबत चंदूला समजल्यानंतर त्याने कल्याणीला लग्न न करण्याबाबत धमकी दिली.

कल्याणी व तिच्या आई-वडिलांनी चंदूला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकत नव्हता. अखेर कल्याणीने भारत या व्यक्तीस गाठले आणि ‘ तू चंदूचा कायमचा काटा काढला तर मी तुला शरीरसुख देईल’, असे ती भारतला म्हणाली. त्याने होकार दिला. त्यानंतर भारत हा कल्याणीच्या आई-वडिलालाही भेटला. त्यांनी देखील चंदूला ठार मारण्यासाठी भारतला दीड लाख रुपये देऊ केले.

त्यानंतर २५ फेब्रुवारीला भारत हा चंदूला घेऊन पाचगावमधील देशी दारूच्या दुकानात गेला. तेथे त्याला दारू पाजली. त्यानंतर तो त्याला घेऊन खदान येथे गेला. त्याच्याशी वाद घातला. त्याला दगडाने मारहाण केली. आरीने चंदूचा गळा कापला व मृतदेह खदानीत फेकला. एका नागरिकाला मृतदेह दिसला. त्याने कुही पोलिसांना माहिती दिली. कुही पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

मृतदेह अनोळखी होता मात्र पोलिसांनी सूत्राच्या माध्यमातून ओळख पटवली आणि गुन्हेगारांपर्यंत पोहचले.प्रकरणाचा तत्काळ छडा लावण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हेशाखेला दिले. गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार, कुहीचे ठाणेदार चंद्रकांत मदने, सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक नरेंद्र गोरखेडे, जावेद शेख, रमेश भोयर, संतोष पंधरे, सतीश राठोड यांनी तपास सुरू केला आणि आरोपीस गजाआड केले.


शेअर करा