‘ मनसुख हिरेन यांचे हात बांधलेले ? ‘ फडणवीसांच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणाले

शेअर करा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच, त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदरच्या खाडीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आलेले असून पोलीस प्रकरणाचा तपास करत असतानाच देवेंद्र फडणवीस व आशिष शेलार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत .

देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनसुख हिरेन यांचे हाथ बांधलेले होते, असे आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे . मनसुख हिरेन यांची डेड बॉडी स्वतः पाहिल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. प्रकरणाचा तपास हा आता एटीएस कडे सोपवण्यात आलेला आहे. आशिष शेलार यांनी सचिन वझे हे पोस्टमार्टेम सुरु असताना तिथे का उपस्थित होते ? यावर देखील आक्षेप घेतला आहे. ‘ आपले वडील कधीच आत्महत्या करणार नाहीत ‘ असा दावा देखील हिरेन यांच्या मुलाने एका निकटवर्तीयांशी बोलताना केलेला आहे . सदर प्रकरणाचा तपास हा एनआयए कडे देण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे .

गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले ?

सापडलेली गाडी हिरेन यांच्या मालकीची नव्हती. त्यांच्या मित्राची गाडी होती. वाझे यांचे हात बांधलेले नव्हते. ठाण्यात पोस्टमार्टम होत आहे. त्यातून सर्व माहिती पुढे येईल तसेच या प्रकरणाचा तपास वाझे करत नसून नितीन अलकनुरे करत आहेत, असं सांगत देशमुख यांनी फडणवीसांचे सर्व मुद्दे खोडून टाकले. त्यानंतर पुन्हा फडणवीसांनी उभं राहून गृहमंत्र्यांच्या निवेदनाला आक्षेप घेतला आणि त्यांनी थेट हिरेन यांनी पोलिसांना दिलेला कबुली जवाब वाचून दाखवला. हिरेन यांनी ही गाडी विकत घेतली असल्याचं कबुली जबाबात म्हटलं आहे. पोलीस तुम्हाला माहिती देत नाही का? पोलीस तुम्हाला चुकीचं ब्रिफिंग करत आहेत का? असा सवाल फडणवीस यांनी केला. तसेच अलकनुरे यांच्याकडे तीन दिवसांपूर्वी तपास दिला आहे. सात दिवस तर वाझेच तपास करत होते, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

फडणवीसांच्या या आरोपावर देशमुखांचा पारा अधिकच चढला. सचिन वाझे… सचिन वाझे काय घेऊन बसला आहात. अर्णव गोस्वामींना आत टाकलं होतं म्हणून तुमचा सचिन वाझेंवर राग आहे का? वाझेंनी अन्वय नाईक प्रकरणात गोस्वामींना अटक केली आणि आत टाकलं, म्हणून तुम्ही राग काढत आहात का? तुमच्याकडे काहीही माहिती असेल तर आम्हाला द्या. पोलिसांना द्या. तपासाला मदतच होईल, असं देशमुख यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण ?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ गेल्या महिन्यात कार आढळली होती. तिची तपासणी केली असता, त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. त्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सुरू होता. ही कार कुणाची आहे याची माहिती उघड झाली होती. मनसुख हिरेन हे या कारचे मालक होते. त्यानंतर ते मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजरही झाले होते.

मनसुख हिरेन असं गाडी मालकाचं नाव आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलेली योगायोगाची मालिका ?

प्रश्न क्रमांक १ : मी आज विधानसभेत मुकेश अंबानींच्या घराबाहेर जी जिलेटिन भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती, त्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. मनसुख हिरेन यांची ही गाडी होती. त्यांची गाडी चोरीला गेली होती. त्यांची गाडी बंद झाली तिथून ते क्रॉफर्ड मार्केटला आले होते. तिथे ते एका व्यक्तीला भेटले, तो व्यक्ती कोण ? हे या प्रकरणाचं मूळ आहे. ही गाडी जिथे सापडली, तिथे लोकल पोलिसांच्या आधी सचिन वाझे हे कसे पोहोचले? त्यांनाच खंडणीच्या धमकीची ती चिठ्ठी कशी मिळाली ?

प्रश्न क्रमांक २ : सचिन वाझे यांचं घर ठाण्यात, जी गाडी चोरी झाली ती सुद्धा ठाण्यातील, इतकंच नाही जी गाडी चोरी होऊन ज्या रुटने आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना IO म्हणजे तपास अधिकारी नेमलं.

प्रश्न क्रमांक ३ : सचिन वाझे सगळ्यात आधी पोहोचले. त्यांनी चिठ्ठी हातात घेतली. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमलं. आश्चर्य म्हणजे जून-जुलैमध्ये २०२० मध्ये सचिन वाझेंचं या गाडी मालकाशी संभाषण झालं होतं.. योगायोग म्हणजे गाडीमालक ठाण्यातले, आयओ ठाण्यातले, ही गाडी ठाण्यातली, त्याच्यासोबत एक गाडी आली ती ठाण्यातूनच आली, त्यापेक्षा संशयास्पद बाब म्हणजे एका टेलिग्राम चॅनलवर एक संघटनेच्या नावाने जैश उल हिंद हा आम्ही अटॅक केलीय, ही गाडी आम्ही ठेवलीय, आम्हाला रॅनसम द्या, क्रिप्टो करन्सी द्या असं पत्र प्रसिद्ध झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी जैश उल हिंद या संघटनेने एक मेल पाठवला आणि सांगितलं आमचा याच्याशी संबंध नाही .

प्रश्न क्रमांक ४ : मी स्वतः डेड बॉडी पाहिलेली आहे. मनसुख हिरेन यांचे हाथ पाठीमागच्या बाजूला बांधलेले आहेत, अशी कोणी आत्महत्या करते का ? असा प्रश्न फडणवीस यांनी सरकारला विचारला आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना , “मी एक शक्यता वर्तवली होती, यातील सर्वात महत्त्वाचा दुवा मनसुख हिरेन हे होते. त्यांना तात्काळ सुरक्षा द्यायला हवी होती. मला आताच माहिती मिळाली, मनसुख हिरेन यांची बॉडी ठाण्याजवळ मुंब्र्याच्या जवळपास सापडली आहे, त्यामुळे हे प्रकरण गंभीरच नाही तर अत्यंत गुंतागुंतीचं आणि सर्वांकरिता चॅलेंजिग आहे. मला वाटतं हा जो योगायोग आहे, यातून जो संशय तयार झालाय आणि इतका प्राईम विटनेसची बॉडी मिळते, निश्चितच यामध्ये काही गौडबंगाल आहे. त्यामुळे ही केस तात्काळ एनआयएला दिली पाहिजे आणि यामागील सत्य बाहेर यायला हवं” असे म्हटले आहे.


शेअर करा