महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार, आजची आकडेवारी धक्कादायक

शेअर करा

राज्यात करोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत. लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. मात्र तरी देखील करोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने, सरकारसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान आज दिवसभरात राज्यात ४३ हजार १८३ नवीन करोनाबाधित वाढले असून २४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुंबईत आज तब्बल ८ हजार ६४६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे कालच्या आकडेवारीपेक्षा आज ३ हजार अधिक रुग्ण वाढले आहेत. बुधवारी मुंबईत ५ हजार ३९४ रुग्ण वाढले होते. त्यामुळे दिवसागणिक वाढणारी रुग्णांची आकडेवारी लक्षणीयरित्या वाढत आहे.

दुसरीकडे आज ३२ हजार ६४१ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,५६,१६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


शेअर करा