पुणे जिल्हा माहिती अधिकारी व व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचं कोरोनानं निधन

शेअर करा

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनानंतर माहिती खात्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांचा माध्यम क्षेत्रामध्ये नावलौकिक होता. ते उत्तम व्यंगचित्रकार देखील होते. अनेक मासिकांमध्ये त्याची व्यंगचित्रे प्रसिद्ध झालेली आहेत.

राजेंद्र सरग यांचा माध्यम क्षेत्रात दांडगा संपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अवघ्या 15 दिवसांनी त्यांचे प्रमोशन होणार होते. राजेंद्र सरग यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्यांची पत्नी आणि मुलगा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील सात जण कोरोनाबाधित झाले आहेत.

राजेंद्र सरग यांचा अल्पपरिचय

  • राजेंद्र सरग हे पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत
  • राजेंद्र सरग यांच्याकडे उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार
  • त्यांच्याकडे उत्तम वार्तांकन कौशल्य , संगणकावर प्रभुत्व, व्यापक जनसंपर्क होता
  • हसतखेळत काम करण्याची वृत्ती आणि सतत कार्यरत राहण्यातच खरा आनंद असतो हे आपल्या आचरणातून ते सदैव दाखवतं.
  • राजेंद्र सरग चांगले व्यंगचित्रकार होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

“पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


शेअर करा