मध्यरात्री काँग्रेस आमदाराला अश्लील कॉल प्रकरणात ‘ वेगळीच ‘ माहिती , पोलिसही हादरले

शेअर करा

व्हिडीओ कॉलची सुविधा आल्यापासून त्याचा गुन्हेगारी कामात देखील चांगलाच वापर होऊ लागलेला आहे .काँग्रेस आमदार नीरज दीक्षित प्रकरणात छतरपूर पोलिसांनी नवा खुलासा असून या आमदाराला अर्ध्या रात्री एक व्हिडीओ कॉल आला होता. या व्हिडिओ कॉलमध्ये आमदारासमोर महिला अश्लिल कृत्य करू लागली. त्यानंतर अश्लिल व्हिडीओ पाठवून त्या महिलेने आमदाराला ब्लॅकमेल करायला सुरु केले आणि अखेर आमदारानं पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसात तपास सुरु झाल्यावर राजस्थानच्या युवकाला अटक करण्यात आली. हा युवकच महिलेच्या आवाजात आमदाराला फोन करत असल्याचं उघड झालं. काँग्रेस आमदार नीरज दीक्षित यांनी २२ तारखेला गढी मलहरा येथे पोहचून या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. एफआयआरमध्ये आमदार नीरज दीक्षित यांनी सांगितले की, एक महिलेने अर्ध्या रात्री मला अश्लिल व्हिडिओ कॉल केला. सकाळी ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता राजस्थानातून चक्क महिलेचा आवाज काढणाऱ्या या ‘ मोहिनी ‘ ला धरण्यात आले.

सायबर सेलच्या माध्यमातून या तपास पथकाने आमदाराला ज्या नंबरवरून कॉल आला आणि मेसेज आला त्याची माहिती काढली. त्या तपासात संबंधित मोबाईल क्रमांक राजस्थानाहून ऑपरेट होत असल्याचं कळालं. त्यानंतर पोलिसांचे एक पथक राजस्थानला पाठवण्यात आलं. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यावर या आरोपीची कसून चौकशी केली तेव्हा धक्कादायक सत्य उघड झालं. महिलेचा आवाज काढण्याचे त्याचे कौशल्य पाहून पोलिसही हैराण झाले.
आरोपीनं जबाबात म्हटलं की, तो मुलीचा आवाज काढून लोकांशी बोलतो. एक रेकॉर्डेड अश्लिल व्हिडीओ बनवून संबंधित व्यक्तीला कॉल केला जातो. जेव्हा ती व्यक्ती जाळ्यात अडकते तेव्हा त्याला ब्लॅकमेलिंग करण्याचं काम सुरू होतं असा त्याने खुलासा केला आहे.

बहुतांश लोक मुलीचे अश्लिल कृत्य आणि बोलण्याचा अंदाज यावरून समजून जातात. त्यानंतर सहजपणे ते जाळ्यात फसतात. आतापर्यंत २१ लोकांना फसवून त्यांच्याकडून १४ लाख रुपये ब्लॅकमेलिंग वसूल केले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. या लोकांनी ज्यांना फसवलं आहे त्यांचा शोध सुरू आहे. मध्य प्रदेशातही मागील काही दिवसांत अशीच प्रकरणं समोर आली होती. अश्लिल व्हिडिओ पाठवून लोकांना जाळ्यात ओढलं जायचं आणि त्यांना लुटण्याचे काम सुरू होते.


शेअर करा