पत्नीला परपुरुषाबरोबर हॉटेलमध्ये धरले मात्र पत्नीचा खुलासा ऐकून पोलिसही चक्रावले

शेअर करा

पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वासाचा धागा पक्का असणं जास्त आवश्यक असतं मात्र काही माणसं या नात्याला काळीमा फासणारं कृत्य करतात. नको असलेल्या किळसवाण्या गोष्टी करुन सामाजिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार शहरात समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला हॉटेलच्या एका खोलीत अनोळखी पुरुषासोबत पकडलं आणि चांगलंच राडा सुरु झाला . दरम्यान घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यानंतर हॉटेलबाहेर मोठी गर्दी उसळली.

संबंधित घटना ही बुधवारी अलिपूरद्वार चौपाटीजवळ असलेल्या एलीट हॉटेलमध्ये घडली. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला हॉटेलमध्ये परपुरुषासोबत बघितलं. याबाबत त्याने आपल्या मित्रांना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर हॉटेलबाहेर एकच गर्दी उसळली. अनेकांनी हॉटेल बंद करण्याची मागणी केली. कारण त्या हॉटेलमध्ये दुष्कृत्य सुरु असल्याचा दावा तेथील स्थानिकांनी केला. हॉटेलबाहेर गर्दी उसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी हॉटेल मालिक राजदीष घोष, मॅनेजर आणि आणखी एका कर्मचाऱ्याला अटक केली.

पोलिसांनी आरोपी महिलेला पकडल्यानंतर तिने पोलिसात आपल्या पतीविरोधात जबाब दिला. “माझ्या पतीनेच मला हॉटेलमध्ये जायला सांगितलं होतं. तसेच एका अनोळखी व्यक्तीला माझ्या खोलीत पाठवून आक्षेपार्ह फोटो काढण्याचा सल्ला दिला होता. तसेच पतीने त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करुन पैसे हिसकावण्याचा दम दिला होता”, असा दावा महिलेने केल्याने पोलिसही चक्रावून गेले.

दुसरीकडे पतीने देखील आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. पतीच्या म्हणण्यानुसार, “माझी पत्नी आज सकाळी जेव्हा घरातून बाहेर निघाली तेव्हा मी तिचा पाठलाग केला. त्यानंतर मी तिला एका हॉटेलमध्ये जाताना बघितलं. त्यानंतर मी माझ्या मित्रांना फोन करुन संबंधित हॉटेलबाहेर येण्यास सांगितलं. त्यानंतर ते हॉटेलबाहेर दाखल झाले. मी हॉटेलमध्ये प्रवेश केला. यावेळी एका खोलीत मला माझ्या पत्नीचा आवाज ऐकू आला. त्यानंतर मी पत्नीला खोलीबाहेर येण्यास सांगितलं. पत्नी खोलीबाहेर आली पण तिच्यासोबत जो व्यक्ती खोलीत होता तो हॉटेलच्या मॅनेजरच्या मदतीने पळून जाण्यात यशस्वी ठरला”.


शेअर करा