बातमी नगरची ..मनोरुग्ण मुलाकडून आई वडिलांना अमानुष मारहाण, नागरिकांनी काढला व्हिडीओ

शेअर करा

आई वडिलांना मुलानेच अमानुष मारहाण केली . मनोरुग्ण असलेल्या या मारहाणीपासून नागरिकांनी वाचवण्याऐवजी चक्क व्हिडीओ काढणे पसंत केले. मानसिक रुग्ण असलेल्या मुलाने काठी आणि दगडाने वयोवृद्ध पालकांना मारहाण केली. दुर्दैव म्हणजे वृद्ध दाम्पत्य मदतीसाठी याचना करत असतानाही त्यांना वाचवण्याऐवजी गावातील रहिवासी मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात दंग होते. या अमानुष मारहाणीनंतर अखेर वृद्ध आईने प्राण सोडला तर वडील गंभीर आहेत .घटना नगर बीड हद्दीवरील शिरूर कासार येथील आहे .

उपलब्ध माहितीनुसार घटना बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील घटशीळ पारगाव येथे शनिवारी सायंकाळी घडली. त्र्यंबक खेडकर आणि शिवबाई खेडकर हे गावातच राहतात. त्यांना बाबासाहेब नावाचा मुलगा आहे. तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. शनिवारी सायंकाळी या मुलाने वृद्धांना अमानुष मारहाण केली. रात्री त्यांना अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान वृद्ध आईचा मृत्यू झाला तर वडील कोमात आहेत. या प्रकरणी अद्याप कसलीही नोंद पोलीस ठाण्यात झाली नाही.

मुलाकडून मारहाण होत असताना वृद्ध दाम्पत्य मदतीची याचना करत होते, यावेळी मदत मिळाली असती तर वृद्धेला जीव गमवावा लागला नसता. मात्र ग्रामस्थ मदतीऐवजी व्हिडीओ काढत बसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मानसिक रुग्ण असलेल्या या धडधाकट मुलांपुढे हतबल झालेले आईवडील लाचार होते म्हणून मदतीसाठी याचना करत होते मात्र तरीही कोणी पुढे गेले नाही त्यामुळे या माऊलीचा चक्क मुलानेच खून केला, असे म्हणता येतील तर नागरिक देखील बघ्याची भूमिका घेत होते हे देखील तितकेच संतापजनक आहे .


शेअर करा