व्यसनमुक्ती प्रबोधनाचे कीर्तन सुरु असतानाच दारुडा आला अन बायकोला म्हणाला ..

शेअर करा

महाराजांच्या कीर्तनाला जाताना पत्नी विचारून गेली नाही, म्हणून एका दारुड्या पतीने आपल्या पत्नीला चालू कीर्तनात मारहाण केली आहे. आरोपीनं हातात शस्त्र घेऊन पत्नीला मारहाण केल्याने कीर्तनातील अन्य लोकंही घाबरून मदतीला येऊ शकले नाही. आरोपी दारुड्या पतीनं चालू कीर्तनात बराच वेळा राडा केल्यावर अखेर महाराजानं स्वतः मध्यस्थी करत प्रकरण शांत केलं आहे. विशेष म्हणजे संबंधित कीर्तन व्यसनमुक्ती प्रबोधनासंदर्भात होत .

उपलब्ध माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील मालेवाडी याठिकाणी ही घटना घडली आहे. आरोपी दारुड्या व्यक्तीनं आपल्या बायकोसोबत भांडण सोडवायला येणाऱ्या अन्य तरुणांदेखील मारहाण केली आहे. माणिक कुंडलिक बदने असं मारहाण करणाऱ्या दारुड्या पतीचं नाव असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळीपासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मालेवाडी गावात दुपारी तीनच्या सुमारास कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. गावातील बरेच लोकं या कीर्तनाला आली होती. पीडित महिला देखील या कार्यक्रमाला आली होती. दरम्यान पीडित महिलेचा पती माणिक बदने याठिकाणी आला. त्यानं ‘तू कोणाला विचारून कीर्तनास आलीस’, असं विचारत पत्नीला शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि चांगलाच राडा घातला.

कीर्तनाच्या ठिकाणी शिवीगाळ नका करू असं समजावून सांगणाऱ्या सुदाम आंधळे आणि मालेवाडीच्या सरपंचाचे पती भुराज बदने यांना आरोपीनं धारदार शस्त्राने वार करत जखमी केलं. त्याचबरोबर गावातील अन्य व्यक्तींना देखील आरोपीनं दगडानं मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे भांडण सोडवायला देखील कोणी पुढं जात नव्हते. शेवटी कीर्तनकार महाराजांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केलं. महिलेच्या तक्रारीनंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शेअर करा