लग्नानंतर पहिल्या प्रियकराशी पुन्हा सूत जुळलं मात्र शेवट झाला ‘ असा ‘ की ..

शेअर करा

लग्नानंतर झालं गेलं सगळं विसरून ती संसारात रमली होती मात्र अचानक तिच्या जुन्या बॉयफ्रेंडची तिच्या संसारात एंट्री झाली आणि सगळ्या प्रकरणाचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील भीमाटंगी येथे एका विवाहित महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या प्रियकरानेही आत्महत्येचा प्रयत्न केला. घरमालकांना कळताच त्यांनी दोघांना रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी विवाहित महिलेला मृत घोषित केले तर तिच्या प्रियकरावर पुढील उपचार सुरू आहेत.

घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, ओडिसा राज्यातील भीमटंगी येथील जाजपूर स्थित जगन्नाथ प्रधान याची काही वर्षांपूर्वी प्रियंका प्रियदर्शनी साहू या तरुणीशी ओळख झाली होती. त्यांच्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर मात्र 2014 मध्ये प्रियंकाने राकेश साहू या तरुणाशी लग्न केलं. राकेश आणि प्रियांकाला तीन वर्षांचा मुलगा आहे. राकेश हा एका खाजगी कंपनीत काम करतो.

लग्नानंतर प्रियांका घरी एकटीच असायची याचदरम्यान ती पुन्हा जगन्नाथ प्रधान यांच्या संपर्कात आली आणि जुनं प्रेम पुन्हा नव्याने वाढू लागलं. गेल्या तीन आठवड्यांपासून प्रियंका जगन्नाथशी दिवसरात्र व्हाट्सएप्प व फेसबुकवर बोलत होती. तिच्या पतीला याबाबत काहीच माहिती नव्हती.एकमेकांच्या संपर्कात असलेल्या या दोघांमध्ये नेमकं काय झालं, ते अद्याप कळू शकलेलं नाही. परंतु जगन्नाथ प्रधान याने प्रियंका आणि तिच्या मुलाची हत्या करण्याचा कट रचला.

उपलब्ध वृत्तानुसार त्यादिवशी प्रियांका घरीच होती. तिचा पती आणि मुलं त्यावेळी घरात नव्हते. यावेळी जगन्नाथ घरी आला व त्याने प्रियांकाचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तेथेच जगन्नाथने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरमालक आल्यावर जगन्नाथ आणि प्रियांका स्वतंत्र खोल्यांमध्ये जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आले.

रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी प्रियांकाला मृत घोषित केले. जगन्नाथवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. पोलिसांना जगन्नाथ याने लिहिलेले एक पत्र सापडले आहे. ज्यामध्ये त्याने प्रियंका आणि तिच्या मुलाची हत्या करेल असं लिहिलं आहे. पोलिसांनी जगन्नाथविरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


शेअर करा