जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल तर .? अन त्यानंतर ‘ जे ‘ घडलं ते भयानक

शेअर करा

प्रेमामध्ये एकमेकांसाठी अनेकजण जीव देण्याच्या गोष्टी करतात किंवा ताशा आणाभाका देखील घेत असतात मात्र आपल्यावर जीवापाड प्रेम करणाराच शत्रू झाला तर ? अशीच घटना नागपुरात घडली आहे. एका प्रियकरानं प्रेयसीला न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडून रेकॉर्डिंग करत धमकावल्याची घटना घडली आहे. ‘सकाळ’नं या संबंधीचं वृत्त प्रकाशित केलं असून नागपूर येथील या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा आहे.

मुलगी आणि आरोपी प्रियकर हे दोघी एकाच गावात राहतात. मुलगी ही नागपूरच्या एका कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाला शिकते. काही दिवसांपूर्वी मुलगी नागपुरात आपल्या नातेवाईकांकडे राहायला आली होती. तेव्हा तिला आरोपी वैभव आवारी राहणार, हिंगणघाट वर्धा याची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. आधीपासून दोघांची ओळखी असल्यामुळे पीडित मुलीनं ही रिक्वेस्ट स्वीकारली. हळहळू गप्पा मारताना दोघेही एकमेकात अडकत गेले आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले.

दोघांच्या प्रेमसंबंधांना तीन वर्ष झाल्यानंतर अचानक काही दिवसांपूर्वी वैभव मुलीकडे दुर्लक्ष करायला लागला त्यामुळे या मुलीनं त्याला सुनावलं. मात्र वैभवनं तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला तिचं प्रेम सिद्ध करण्यास सांगितलं. तुझं माझ्यावर खर प्रेम असेल तर मला तसा कॉल कर असेही तो म्हणत होता. मुलीने देखील केवळ संबध बिघडू नयेत म्हणून त्यांचे म्हणणे ऐकले आणि इथूनच ब्लॅकमेलचा खेळ सुरु झाला .

वैभवने मुलीला प्रेम सिद्ध करण्यासाठी न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडलं. वैभववर विश्वास ठेऊन मुलींना त्याला तसा कॉलही केला. मात्र वैभवनं हा सगळं कॉल रेकॉर्ड केला. इतकंच नाही तर सोशल मीडियावर हे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकीही दिली. या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि तिनं जरीपटका पोलिसांकडे तक्रार केली. मुलीनं दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी वैभवला अटक केली आहे.


शेअर करा