शेतकऱ्याच्या तक्रारीवर उपजिल्हाधिकारी चक्क वेष बदलून खताच्या दुकानावर

शेअर करा

जेव्हा नियमबाह्य होत असलेल्या कामाची चक्क वेष बदलून उपजिल्हाधिकारी पाहणी करतात तेव्हा चर्चा तर होणारच. आंध्र प्रदेशातील विजयवाडाचे उपजिल्हाधिकारी जी सूर्य परवीन चंद यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून त्यांचे खत खरेदी करतानाचे फोटो व्हायरल होत आहे. खत खरेदी करण्यामागचा जी सूर्य परवीन चंद यांचा उद्देश हा फक्त शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीच्या चौकशीचा होता. कैकलुरू आणि मुदिनेपल्ली मंडळाच्या खतांच्या दुकानांवर खत खरेदी करण्यासाठी ते चक्क शेतकरी वेशात आले मात्र दुकानदारांची मात्र यानंतर चांगलीच भंबेरी उडाली.

उपजिल्हाधिकारी जी सूर्य परवीन चंद यांना असे दिसून आले की, अनेक दुकानदार एमआरपीपेक्षा जास्त किंमतीत डायमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि युरिया विकत आहेत शिवाय दुकानदार खत खरेदीचे कोणतेही शेतकऱ्यांना बिल देत नव्हते. दुकानदारांनी आपली गोदामे खताने भरली आहेत म्हणजेच त्यांनी मार्केट पाहून खतांचा मोठा साठा देखील करून ठेवला होता.

@sushilrTOI या ट्विटर अकौंटवरून खत खरेदी करतानाचे हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, जी व्यक्ती खत घेताना दिसत आहे. ती आयएएस अधिकारी जी सूर्य परवीन चंद आहे. शेतकऱ्यांसोबत या फसवणुकीबाबत परिसरातील एका दुकानदाराने त्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःच वेष बदलत शुक्रवारी चौकशीसाठी हे पाऊल उचलले.

उपजिल्हाधिकारी जी सूर्य परवीन चंद यांनी ज्या दोन दुकानदारांना हेराफेरीसाठी पकडले, त्यांच्यावर कठोर कारवाई केली. ती दोन दुकाने जप्त करण्यात आली आहेत. युरिया ज्याची किंमत 266.50 आहे, ते या दुकानदाराला 280 रुपयांना विकत होते. एवढेच नाही तर ते ग्राहकांचे आधार डिटेल्सही घेत नसल्याचे यावेळी आढळून आले होते.


शेअर करा