धनंजय मुंडे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर, ढगफुटीमुळे नुकसानीची केली पाहणी

शेअर करा

आष्टी/बीड(प्रतिनिधी-गोरख मोरे): आष्टी तालुक्यातील तागड खेल, सावरगाव, गंगादेवी, शेडाला, मराठवाडी, देऊळगाव घाट, आदी परिसरात ढगफुटी अतिवृष्टीने या भागातील अनेक शेतकऱ्यांचे ठीक पूर्ण पाण्यात जाऊन अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री ना. धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी राधा शर्मा, आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे (काका), यांनी आष्टी तालुक्यातील तागड खेल/सावरगाव परिसरात ढगफुटी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून या भागातील शेतकरी/शेतमजूर यांना मा. ना. धनंजय मुंडे यांनी धीर दिला.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांना नवी नाही, शेतकऱ्यांनी खचून जाता कामा नये, शेतकऱ्यांच्या पाठीमागे महा विकास आघाडीचे सरकार खंबीरपणे उभे आहे, ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असे असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देश दिले तर पीक नुकसानी सह रस्ते व पाण्याचे प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असून पंचनाम्यात वाहून गेलेल्या किंवा तुटलेल्या रस्त्यांच्या कामासाठी तातडीने निधी देऊन विशेष करून, कमी पावसाच्या क्षेत्रात शेततळ्यांना आस्ती करण्यासाठी सहाय्य करण्यात यावे, अशी मागणी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे (काका) यांनी याप्रसंगी बोलताना केली.

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक बीड जिल्हा सरचिटणीस शौकत पठाण, सतीश शिंदे, शिवाजी नाकाडे, डॉक्टर शिवाजी राऊत, अण्णासाहेब चौधरी सुनील नाथ, परशुराम मराठे, बाळासाहेब गरजे, मनोज चौधरी, शिवाजी शेकडे, महादेव कोंडे, महादेव डोके, संदीप मस्के, रामभाऊ सांगळे, हरी सांगळे, नंदू गव्हाणे, पांडुरंग शिरसाठ, हरी भाऊ दहातोंडे, श्यामराव घोडके, विठ्ठल नागरगोजे, असलम पठाण, उपविभागीय अधिकारी मुंडलोड, तहसीलदार राजाभाऊ कदम, जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह अधिकारी या सर्वांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर ती जाऊन पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली.


शेअर करा