शहर सहकारी बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली , आणखी तब्बल ‘ इतक्या ‘ जणांच्या विरोधात दोषारोपपत्र

शेअर करा

शहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज वाटप प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने डॉक्टर निलेश शेळके या व्यतिरिक्त इतर 17 आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे, या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत केवळ सहाच आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींना गुन्ह्यात अटक झालेली नाही. या गुन्ह्यात शेळके विरुद्ध यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल झाले आहे त्यानंतर आता मधुकर पांडुरंग वाघमारे, योगेश मदनलाल मालपाणी, मुकुंद रामचंद्र घैसास (मयत ), अशोक माधवराव कानडे, विजय माणिकचंद भंडारी, शिवाजी अशोकराव कदम, रेश्मा राजेश चव्हाण-आठरे, सुरेखा राजेंद्र विद्ये, दिनकर यशवंत कुलकर्णी जवाहर हस्तीमल कटारिया, डॉक्टर भास्कर रखमाजी सिनारे, डॉक्टर रवींद्र दौलतराव कवडे, डॉक्टर विनोद अण्णासाहेब श्रीखंडे, प्रदीप जगन्नाथ पाटील, बाळू नारायण कटके, महेश रघुनाथ धेंड, दिनेश कचरू लोखंडे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी रोहिणी भास्कर सिनारे यांची फिर्याद आहे, आपल्या नावावर पाच कोटी 75 लाख रुपयांचे बोगस कर्ज वितरण करून फसवणूक करण्यात आली अशी त्यांची तक्रार आहे. बँक अधिकारी व संचालक यांनी डॉक्टर शेळके यांच्याशी हातमिळवणी करून हे बोगस कर्ज वितरण केले, अशी सिनारे यांची फिर्याद होती. दरम्यान या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आत्तापर्यंत केवळ शेळके, वाघमारे व मालपाणी यांना अटक केली आहे. फिर्यादीचे पती डॉक्टर सिनारे, दुसरे आरोपी डॉक्टर कवडे, डॉक्टर श्रीखंडे या तीन डॉक्टरांचा नंतर आरोपींमध्ये समावेश करून देखील करून त्यांना अटक करण्यात आली. फिर्यादीच्या पतीला अटक होण्याचा हा प्रकार या गुन्ह्यात घडला आहे. चुकीच्या पद्धतीने अटक केली, असे म्हणणे अटक केलेल्या डॉक्टरांच्या वकिलांनी न्यायालयात मांडलेले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात फिर्यादीच्या पतीसह ज्या डॉक्टरांनी या बोगस कर्जाविषयी तक्रारी केल्या होत्या त्यांनाच अटक करण्यात आली मात्र नियमबाह्य पद्धतीने कर्ज वितरण करणारी बँकेचे अधिकारी व संचालक यांना मात्र अद्यापही अटक झालेली नाही. फॉरेन्सिक ऑडिटचा अहवाल आल्यानंतर त्यांना अटक केली जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली असल्याने या तपासाबद्दल नागरिकांमध्ये देखील मोठी उत्सुकता आहे .


शेअर करा