मोहटादेवी दर्शनासाठी ई- पास काढण्याचा शुभारंभ

शेअर करा

पाथर्डी प्रतिनिधी: कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नवरात्र उत्सवात मोहटादेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना ई- पास काढणे अनिवार्य केल्यामुळे व रोज पाच हजार भाविकांनाच ई- पास मिळेल, असे आदेश काढल्यामुळे ॲड. प्रतिक खेडकर व जगदंब युवा प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी ई- पास काढून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. याचा शुभारंभ युवा नेते अजय रक्ताटे यांच्या हस्ते झाला.

अजय रक्ताटे म्हणाले, नवरात्रोत्सवात भाविकांना मोहटादेवीचे दर्शन घेण्यासाठी ॲड. प्रतिक खेडकर मित्र मंडळाच्यावतीने ई- पास उपलब्ध करून देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. मोहटादेवीला जाणाऱ्या महिला भक्त जास्त प्रमाणात असतात. ग्रामीण भागातील भाविक मोठ्या प्रमाणावर नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी येतात. मात्र त्यांना ई- पास बद्दल माहिती नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते.अनेक भाविकांकडे पास नसल्यामुळे मोहटादेवी गडाच्या पायथ्या वरून दर्शन न घेताच परत यावे लागते. मात्र भाविकांची गरज ओळखून जगदंब युवा प्रतिष्ठान च्या मार्फत भाविकांना ई- पास उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांची देवीच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होणार आहे. ॲड. प्रतिक खेडकर यांचे उपक्रम लोकहिताचे असतात. तत्पर सेवा , उत्कृष्ट नियोजन व सामाजिक कामाची वृत्ती यामुळे त्यांना नागरिका कडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. कालच आयोजित सर्व रोग निदान शिबिरासाठी खेडकर यांनी रुग्णांना मोफत वाहनांची सोय केली होती. वर्षभर सामाजिक कार्यक्रम राबवण्यात ॲड. प्रतीक खेडकर व जगदंब युवा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य अग्रेसर असतात, असे रक्ताटे म्हणाले.

या शुभारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे ,भैया गांधी, पांडुरंग हंडाळ हे होते. तसेच सौरभ खरमाटे ,पवन दहिफळे, अजय विघ्ने , यश आरोळे, वैभव गाडे , अभिषेक शेळगावकर , पवन बोरुडे , प्रसाद देशमुख, वैभव केदार ,अमोल पवार , साकिब पठाण, प्रतीक धरणकर, अविष्कार चिंतामणी, नितीन पवार , महिंद्र आरगडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. प्रतिक खेडकर यांनी केले तर प्रसाद देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.


शेअर करा