खळबळजनक..नगर कोतवाली पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात गळफास घेतलेला मृतदेह आढळला

शेअर करा

नगर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यातील आवारात असलेल्या स्वच्छतागृहात निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. ज्ञानेश्वर तुकाराम मराठे ( वय 62 तालुका फलटण जिल्हा सातारा ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यासाठी बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कामगार गेला असता आतून दरवाजा बंद असलेल्या एका स्वच्छतागृहात लुंगीने गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. त्याच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये आधार कार्ड, वाहन परवाना आणि कपडे सापडले त्यावरून त्यांची ओळख पटली. त्यांच्याकडे 16 तारखेचे एसटीचे तिकीट देखील आढळून आले असून त्यावरून ते 16 तारखेला नगरला आल्याचा अंदाज आहे.

नगरला आल्यानंतर गळफास घेण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यांमधील जागा का निवडली ? याविषयी शहरात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान कोतवाली पोलिसांनी त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.


शेअर करा