‘ .. म्हणून तुझं सासरी पटत नाही ‘, भोंदूबाबाच्या असल्या ‘ मास्टरप्लॅन ‘ ला महिला भुलली अन ..

शेअर करा

देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरीदेखील लोकांच्या मनावरील अंधश्रद्धेचा पगडा काही कमी होताना दिसत नाही. अशीच एक धक्कादायक घटना नांदेड इथे उघडकीस आली असून ‘ तुमच्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे म्हणून तुमचं सासरी पटत नाही ‘ , असे सांगून एका भोंदूबाबाने एका विवाहितेवर अत्याचार केले सोबतच सदर महिलेकडे भोंदूबाबाच्या मित्राने देखील शरीरसुखाची मागणी केली. अजिजबाबा असे या बाबाचे नाव असून त्याचा मित्र शेख याहिया याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर अजिजबाबा फरार आहे .

उपलब्ध माहितीनुसार, 23 वर्षीय पीडित विवाहितेचा आपल्या सासरच्या लोकांसोबत वाद सुरू होता. छोट्या छोट्या कारणातून तिचे सासरच्या मंडळींसोबत खटके उडत होते त्यामुळे ती निराश होती. आरोपीनं पीडितेच्या कौटुंबीक वादाचा फायदा उचलत तिच्यावर जादूटोणा झाला असल्याची बतावणी केली आणि जादूटोणा झाल्याने सासरच्या मंडळीसोबत खटके उडत आहे. मी जादूटोणा दूर करून तुझा संसार सुरळीत करतो, असं सांगून अजीज बाबा याने पीडितेला आपल्या घरी बोलावलं.

महिलेला घरी बोलावल्यानंतर अजीजबाबाचा प्लॅन तयारच होता. 23 वर्षीय पीडित महिला अजीज बाबाच्या घरी गेली आणि आरोपीनं तिला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं. तिला गुंगी येताच आरोपीनं पीडितेला विवस्त्र करत तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओज शूट केले. संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला मात्र त्यानंतर महिला शुद्धीत येताच मुख्य आरोपी अजीजचा मित्र शेख याहिया यानेही पीडितेकडं लैंगिक सुखाची मागणी केली.

महिलेने यास विरोध केला असता अजीज याने काढलेले सर्व फोटो आणि व्हिडीओज आरोपीनं पीडित महिलेच्या पतीला पाठवून दिले यामुळे महिलेने आरोपी बाबाच्या विरोधात पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि ब्लॅकमेलच्या कलमाअंतर्गत अजिजबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शेख याहिया याला अटक केली असून मुख्य आरोपी अजीज बाबा सध्या फरार आहे.


शेअर करा