पुणे हादरलं..’ तुझ्या बायकोला कमरेखाली अपंग करतो फक्त एकदा..’, भोंदूबाबासाठी पोलिसांचा प्लॅन

शेअर करा

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरी लोकांच्या मनावरील अंधश्रद्धेचा पगडा काही कमी होण्याचे नाव घेत नाही. अशीच एक घटना पुणे इथे वाकडला समोर आली असून मूळ बीड येथील असलेल्या भोंदू बाबाने एका महिलेला तिचं कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे या महिलेच्या पतीने बीड इथे जाऊन या बाबाची भेट घेतली होती आणि स्वतः आपल्या पत्नीला कंबरेपासून खाली अपंग करण्याची मागणी केली होती. विलास बापूराव पवार उर्फ महाराज (रा. पिंपळवंडी पाटोदा, बीड) असे या आरोपी भोंदू बाबाचे नाव असून सदर महिलेला आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील त्यानंतर ती कमरेखाली अपंग होईल, असा दावा करत तो तिला फोन करून आग्रह करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिलेचे आणि पतीचे फारसे पटत नव्हते म्हणून याच भांडणाला कंटाळून पतीने थेट बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे जाऊन विलास पवार या भोंदू बाबाची भेट घेतली. तिथं माझ्या पत्नीला कंबरेच्या खाली अपंग करून जादूटोणा करा अस सांगितलं त्यानंतर भोंदू बाबा विलासने स्वतः पीडित महिलेला फोन करून तुझा पती माझ्याकडे आला होता. त्याने तुला कंबरेपासून खाली अपंग करण्यास सांगितले आहे असे सांगितले.

महिलेचा नंबर हाती आल्यावर भोंदू बाबाने सातत्याने पीडित महिलेशी फोनवरून संपर्क साधत तुमचा पती तुमचे वाईट करण्यास सांगत आहे. तुम्हाला तुमचा संसार, कुटुंब सुखी ठेवायचा असल्यास माझ्याशी शारीरिक संबंध ठेवा, अशी मागणी केली मात्र महिलेने त्याला दाद दिली नाही म्हणून या भोंदू बाबाने आणखी एक खेळी खेळली मात्र त्याला बेड्याच हाती आल्या.

भोंदू बाबाने पीडित महिलेला भीती दाखवत तुमच्या पोटात गाठी झाल्या असून तुमचं आयुष्य थोडेच राहिले आहे मात्र तुम्ही या सर्वातून सुटू शकता . ज्या व्यक्तींच्या विशिष्ट अवयवावर आणि तळ हातावर तीळ आहे त्याच्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवल्यास तुमचे कुटुंब, संसार सुखी होईल असा दावा केला. आणि काही वेळानेच भोंदू बाबाने स्वतःचा अश्लील व्हिडिओ पीडित महिलेला पाठवला. त्यात तळ हातावर आणि विशिष्ट अवयवावर तीळ असल्याचं व्हिडीओमधून त्या महिलेला दाखवलं. भोंदू बाबाच्या मोबाईलवरून असला व्हिडीओ पाहून महिला घाबरून गेली आणि महिलेने वाकड पोलिसांकडे धाव घेतली.

भोंदू बाबा विलासवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर त्याला शारीरिक संबंधाचे आमिष दाखवून पुण्यात बोलावण्यात आले. भोंदू बाबा पुण्यात आला असताना त्याला डांगे चौक येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.


शेअर करा